‘एम्.आय.एम्.’ पक्षाच्या वतीने मिरज शहरात टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योत मिरवणूक !

टिपू सुलतानच्या जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेली क्रांतीज्योत मिरवणूक

मिरज – ‘एम्.आय.एम्.’ पक्षाच्या वतीने मिरज शहरात टिपू सुलतानच्या जयंतीच्या निमित्ताने क्रांतीज्योत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस जैलाब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेंद्र थोरात, तसेच अन्य उपस्थित होते. या प्रसंगी ‘एम्.आय.एम्.’चे डॉ. महेशकुमार कांबळे म्हणाले, ‘‘जेव्हा पेशवे आणि निजाम हे इंग्रजी सत्तेच्या बाजूने चाल करून आले, तेव्हा टिपू सुलतान यांनी इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध लढा दिला होता. त्यामुळे टिपू सुलतान हेच या देशाचे पहिले स्वातंत्र्यवीर होते.’’ (हिंदूंवर अनन्वित अत्याचार करून हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करणार्‍या, सहस्रो हिंदु मंदिरे तोडणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानला स्वातंत्र्यवीर म्हणणे, ही बौद्धीक दिवाळखोरीच आहे. हिंदूद्रोह्यांचे उदोउदो करणार्‍यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. – संपादक)

संपादकीय भूमिका

टिपू सुलतानचा उदोउदो करणार्‍यांनी भारतात राहू नये, असेच सामान्य जनतेला वाटते.