श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या निवेदनानंतर तासगाव (जिल्हा सांगली) येथील टिपू सुलतानच्या जयंतीचा कार्यक्रम रहित !

तासगाव – येथे आयोजित केलेला टिपू सुलतानच्या जयंतीचा कार्यक्रम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर रहित करण्यात आला. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, क्रूरकर्मा, धर्मांध, हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आनंद मानणार्‍या टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्याचे लोण कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रात पसरत आहे. टिपू सुलतान हा समाजाचा आदर्श कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे हिंदु धर्म, हिंदुस्थान यांची घृणा करणारा टिपू सुलतान याची जयंती साजरी करणे, हे केवळ तासगाव शहरातच नाही, तर प्रत्येक ठिकाणी अशी जयंती साजरी करणे तात्काळ बंद झाले पाहिजे. यामुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याने पोलिसांनी या संदर्भात योग्य त्या उपाययोजना कराव्यात. या निवेदनामुळे तासगाव येथील टिपूू सुलतानच्या जयंतीचा कार्यक्रम रहित झाला आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.