साधकांना सेवा सांगतांना देवाशी अल्प प्रमाणात अनुसंधान साधले जाऊन आनंद मिळण्याचे प्रमाण अल्प असणे; मात्र स्वतः सेवा करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, असे जाणवून आनंद मिळणे

कु. वेदिका मंगेश खातू

‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात साधकांना स्वयंपाकघरातील भाजीच्या मांडणीमध्ये भाजी व्यवस्थित लावण्याची सेवा सांगून त्यांच्याकडून ती करवून घेतांना माझे देवाशी अनुसंधान अल्प प्रमाणात होत होते. त्या वेळी मला आनंदही अल्प प्रमाणात मिळत होता; मात्र तीच सेवा मी स्वतः करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या समवेत आहेत आणि तेच हे सर्व करवून घेत आहेत’, असे जाणवून मला आनंद होत होता. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला याच स्थितीत ठेवावे’, असे मला वाटत होते.’

– कु. वेदिका मंगेश खातू, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक