हिंगोली येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या हिंदु तरुणीवर धर्मांधाकडून धर्मांतराचा दबाव !

  • तरुणीच्या तक्रारीवरून साजीद पठाण पोलिसांच्या कह्यात !

  • जिवे मारण्याची धमकी !

(‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे विवाह न करता एकत्र रहाण्याचा अनैतिक प्रकार)

हिंगोली – जिल्ह्यातील रेडगाव येथे साजीद रफीकखाँ पठाण (रा. जवळा पांचाळ) याने हिंदु तरुणीला विवाहाचे आमीष दाखवून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर त्याने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याचे शपथपत्र सिद्ध केले; मात्र काही दिवसांतच त्याने धर्मांतरासाठी दबाव आणून तिला जिवे मारण्याची धमकी दिली. हिंदु तरुणीच्या तक्रारीवरून पठाण याच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबरच्या रात्री गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी धर्मांध साजीदला कह्यात घेऊन चौकशी चालू केली आहे.

१. २१ वर्षीय हिंदु तरुणीला साजीद रफीकखाँ पठाण याने विवाहाचे आमीष दाखवून ८ जुलै २०२२ या दिवशी पळवून नेले. शोध घेऊनही ती न सापडल्याने कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

२. साजीद पठाण याने तरुणीला अनेक ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. काही कालावधीने तो तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणत होता; मात्र तिने धर्मांतरासाठी विरोध केल्यानंतर तिला त्रास देऊन जिवे मारण्याची धमकी तिला दिली.

३. तरुणी साजीदला सोडून घरी परतली; पण अपर्कीतीच्या भीतीने कुटुंबियांनी कुठेही वाच्यता केली नाही.

४. साजीदकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

५. दोघांनीही फरिदाबाद (देहली) येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याचे शपथपत्र सिद्ध केले. त्यानंतरच ते परत एकत्र राहू लागले.

६. त्या वेळी पोलीस चौकशी झाल्यावर त्यांनी शपथपत्र दाखवले. त्यामुळे पोलिसांनी दोघांचेही जबाव नोंदवले होते. त्यात तरुणीने ‘साजीद याच्या समवेतच रहाणार’, असा जबाब दिला होता. (‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या हिंदु तरुणींना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यावरून लक्षात येते !- संपादक)

संपादकीय भुमिका

हिंदु तरुणींनो, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे दुष्परिणाम जाणा !