(म्हणे) ‘सावरकरांनी ९ वेळा इंग्रजांची क्षमा मागितली, तर देशासाठी नेहरू ९ वर्षे कारागृहात राहिले !’

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे सावरकरद्वेषी विधान

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंडित नेहरू यांची प्रतिमा मलीन करत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारला लक्ष्य केले. गेहलोत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्यातील योगदानाविषयी प्रश्‍न उपस्थित केले. ते म्हणाले की, भाजपचे लोक सावरकरांचे सतत नाव घेतात; पण कारागृहात जाताच सावरकरांनी वर्षभरात ९ वेळा इंग्रजांची क्षमा मागितली होती. (‘खोटे बोल, पण रेटून बोल’, याचे उदाहरण म्हणजे अशोक गहलोत ! – संपादक) याउलट देशासाठी नेहरू हे ९ वर्षे कारागृहात राहिले.

गहलोत पुढे म्हणाले की,

१. जेव्हा महायुद्ध चालू झाले, तेव्हा सावरकरांनी ब्रिटिशांसाठी भरती केली. (गहलोत यांचा जावईशोध ! सावरकर यांनी भारतभरातील हिंदूंना सैन्यात भरती होण्यामागील उद्देशही स्पष्ट केला होता. तो असा की, ‘एकदा का सैनिकी शिक्षण घेतले की, बंदुकीची दिशा ब्रिटनच्या शत्रूकडे रोखायची कि ब्रिटनकडे ?’, हे आपल्याला ठरवता येईल ! हे गहलोत सोयीस्कररित्या विसरतात ! – संपादक) पंडित नेहरूंशी त्यांची स्पर्धा कशी होईल ?

२. संपूर्ण देशात धर्माच्या नावाखाली एक रचना निर्माण झाली आहे. हे दुर्दैव आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणे सर्वांत सोपे आहे.

३. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनाच्या समारंभातून नेहरूंचे नाव गायब झाले. नेहरूंचे योगदान आणि त्यांचे नाव पुसून टाकण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. (सावरकर यांच्या जीवनकाळात आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा द्वेष करणार्‍या काँग्रेसने खरेतर अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)

४. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ने भाजपला चिंतेत टाकले आहे. (‘भारत जोडो’ यात्रा काढणारी काँग्रेस ‘भारत तोडला कुणी ?’, हे का सांगत नाही ? – संपादक) राहुल गांधी यांच्या दौर्‍याचा संदेश प्रत्येक गावात पोचला आहे.

संपादकीय भूमिका

  • नेहरू यांच्या कारागृहवासाविषयी बढाया मारणारे गहलोत हे ‘दोन जन्मठेपा, म्हणजे ५० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झालेले सावरकर हे जागतिक स्तरावर एकमेवाद्वितीय राजकीय कैदी आहेत’, याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करतात !
  • सावरकर हे ज्या जाचाला सामोरे गेले, त्याच्या एकशतांश त्रासतरी नेहरू अथवा काँग्रेसच्या एकातरी नेत्याला झाला आहे का ?, यावर गहलोत कधीच आणि काहीच बोलणार नाहीत, हेही तितकेच खरे ! अशी सावरकरद्वेषी आता काँग्रेस आता हिंदूंकडूनच नामशेष होत आहे !