पुणे ग्रामीण भागातील फेर्‍या बंद करण्याचा ‘पी.एम्.पी.’चा निर्णय !

ओमप्रकाश बकोरिया

पुणे – पी.एम्.आर्.डी.ए. क्षेत्रात २ वर्षांपूर्वी चालू केलेल्या; पण आता तोट्यात असणार्‍या ४० मार्गांवरील फेर्‍या पी.एम्.पी. प्रशासन बंद करणार आहे. या मार्गांवर खासगी वाहतूकदारांच्या बस धावत असल्याने नवे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ते ४० मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एस्.टी.ची सेवा चालू झाल्यानंतरच पी.एम्.पी.ची सेवा बंद केली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने याची कार्यवाही होईल. याविषयी पत्र देणार असल्याची माहिती पी.एम्.पी.एम्.एल्. पुणेचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.