मोरबी (गुजरात) येथील झुलता पूल कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १३४  

मोरबी (गुजरात) – येथे मच्छु नदीवरील झुलता पूल कोसळून झालेल्या अपघातात आतापर्यंत १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ४५ मुले आणि महिला यांचा समावेश आहे. या अपघातात राजकोटमधील भाजपच्या खासदाराच्या कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

३० ऑक्टोबरला सायंकाळी ६.३२ वाजता हा ७६५ फूट लांब आणि अवघा साडेचार फूट रुंद झुलता केबल पूल कोसळला. वर्ष १८८७ मध्ये, म्हणजे १४३ वर्षांपूर्वी येथील ठाकोर राजाने तो त्या वेळच्या प्रगत युरोपीय तंत्रज्ञानाद्वारे बांधून घेतला होता. क्षमतेपेक्षा अधिक जण पुलावर एकत्र आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची विशेष अन्वेषण पथकाकडून चौकशी करण्यात येणार आहे.