विशाखापट्टणम् येथील कु. प्रेरणा कणसे (वय २० वर्षे) यांना युवा कार्यशाळेसाठी रामनाथी, गोवा येथे येतांना आणि आल्यावर आलेल्या अनुभूती !

कु. प्रेरणा कणसे

१. गोवा येथे होणार्‍या युवा कार्यशाळेसाठी येतांना अडचणी येणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर अडचणी दूर होणे

‘युवा कार्यशाळेसाठी विशाखापट्टणम्हून गोव्याला येतांना मला पुष्कळ अडचणी आल्या. मला रेल्वेचे तिकीट मिळत नव्हते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘माझी तळमळ अल्प पडत आहे.’ त्यामुळे मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘मला युवा कार्यशाळेसाठी रामनाथीला यायचे आहे.’ नंतर एक घंट्यानेच ‘मला रेल्वेचे तिकीट मिळाले आहे’, असे कळले. तेव्हा मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने विशाखापट्टणम् ते गोवा असा प्रवास प्रथमच एकटीने करणे

यापूर्वी मी कधीच एकटीने प्रवास केला नव्हता; परंतु मी कृतज्ञताभावात राहून ‘गुरुदेव माझ्या समवेत आहेत आणि ते माझी काळजी घेत आहेत’, असा भाव ठेवून एकटीने प्रवास केला.

३. रामनाथी आश्रमात नामजप केल्यावर हलकेपणा जाणवून आनंद मिळणे

मी रामनाथी आश्रमात आल्यावर १५ मिनिटे नामजप केला. तेव्हा माझ्या शरिरावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट झाले आणि मला हलकेपणा जाणवून आनंद मिळाला.

४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी वातावरणात चैतन्य आणि आनंद जाणवणे

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी आम्हाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रार्थना केल्यावर ‘संपूर्ण सभागृहात चैतन्याचे कवच निर्माण झाले. त्यांच्या समवेत सूक्ष्मातून गुरुदेव उपस्थित आहेत. चैतन्य, सुगंध आणि पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला वाटले. त्यामुळे वातावरणात पुष्कळ आनंद जाणवत होता.

५. रामनाथी आश्रमात आल्यावर २ – ३ दिवसांनी तोंडवळ्यात पालट जाणवून तो आनंदी दिसणे

रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होत होते. त्यामुळे आश्रमात आल्यावर पहिल्या दिवशी माझ्या चेहर्‍यावर आवरणामुळे काळपटपणा जाणवत होता. मला ‘माझा चेहरा बघू नये’, असे वाटत होते; परंतु २ – ३ दिवसांनी मला माझ्या चेहर्‍यात पालट जाणवला. संत आणि अनेक साधक यांनीही मला सांगितले, ‘‘आता चेहरा आनंदी दिसत आहे.’’

६. संतांनी ‘आनंदी दिसत आहेस’, असे म्हणणे

एक संत मला म्हणाले, ‘‘तुझा चेहरा आनंदी दिसत आहे.’’ मला संपूर्ण वातावरणात त्यांच्यातील प्रीतीची स्पंदने जाणवत होती. मला माझे हात आणि पाय गुलाबी जाणवत होते.

मला गुरुदेवांच्या कृपेमुळे अशा अनुभूती आल्या. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. प्रेरणा कणसे (वय २० वर्षे), विशाखापट्टणम् (१८.११.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत