मुसलमानांना माझी हत्या करून माझे रक्त चाखायचे आहे !

नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांचे धक्कादायक ट्वीट

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – मला अनेक मुसलमानांकडून (प्रामुख्याने पाकिस्तानी मुसलमानांकडून) धमक्या मिळत आहेत. त्यांना नेदरलँड्समध्ये येऊन मला मारायचे आहे, माझा शिरच्छेद करायचा आहे, तसेच माझ्या शरिराचे १५ तुकडे करायचे आहेत. माझी कुत्र्यासारखी हत्या करायची आहे. मला फाशी द्यायची आहे. जर मी कोणत्याही सुरक्षेविना बाहेर पडलो, तर ते माझी हत्या करतील.

मुसलमानांना माझी हत्या करून माझे रक्त चाखायचे आहे, असे धक्कादायक ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले.