(१०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे साधारण ८३० कोटी रुपये मालमत्ता असलेल्या व्यक्तीला अतीश्रीमंत म्हणजेच ‘सेंटी-मिलिअनेयर्स’ म्हटले जाते.)
नवी देहली – जगभरातील २५ सहस्र ४९० अतीश्रीमंत लोकांपैकी (‘सेंटी-मिलिअनेयर्स’पैकी) भारत हा अशा १ सहस्र १३२ अतीश्रीमंत लोकांचा देश आहे. अमेरिका (९ सहस्र ७३० अतीश्रीमंत) आणि चीन (२ सहस्र २१ अतीश्रीमंत) यांच्यानंतर यासंदर्भात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. युनायटेड किंगडम (९६८) चौथ्या क्रमांकावर असून जर्मनीचा (९६६) पाचवा क्रमांक लागतो. ही आकडेवारी ‘हेन्ले अँड पार्टनर्स’ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक स्थलांतर सल्लागार आस्थापनाच्या अहवालातून समोर आली आहे.
१. या अहवालानुसार भारताने युनायटेड किंगडम, जर्मनी, रशिया आणि स्वित्झर्लंड या प्रगत देशांनाही मागे टाकले आहे.
२. अतीश्रीमंत होणार्यांचे प्रमाण हे व्हिएतनाम, भारत आणि मॉरिशस येथे सर्वाधिक आहे.
३. न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक अतीश्रीमंत लोक रहातात. मुंबई हे या सूचीत १५ व्या क्रमांकावर असून तेथे २४३ अतीश्रीमंत लोक रहातात.