पाकिस्तानमध्ये २ हिंदु मुलींचे अपहरण

पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास नकार  

प्रतिकात्मक छायाचित्र

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातून दोघा हिंदु मुलींचे अपहरण करण्यात आले. या विषयीचा गुन्हा नोंदवण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिल्यामुळे या मुलींच्या आईने येथे निदर्शने केली. अपहरणाची घटना गेल्या आठवड्यात सुक्कुर येथील पट भागात घडली. त्या त्यांच्या मुलींसमवेत घरी जात असतांना ३ पुरुषांनी मुलींचे अपहरण केले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या महिलेला मारहाण केली.

संपादकीय भूमिका

  • पाकमध्येच हिंदू असुरक्षित आहेत, असे नाही, तर बहुसंख्य असलेल्या भारतातही हिंदू असुरक्षित आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • पाकिस्तानमधील पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही उलट त्यांनु गुन्हा नोंदवला असता, तर आश्‍चर्य वाटले असते !