‘देवतांनाही साधकांनी समष्टी साधनेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे’, असे वाटते’, याविषयी साधिकेला आलेली प्रचीती !

कु. सुप्रिया जठार

१. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्य दाखवण्याचे ठरवणे

‘वर्ष २०२१ च्या दिवाळीला मी घरी गेले होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मागच्या वर्षी मला होत असलेल्या त्रासांमुळे मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीच्या नैवेद्यासाठी काही विशेष बनवले नाही; पण या वर्षी कडबू (कणकेची लहान पोळी करून त्यात पुरणाचे सारण घालून करण्यात येणारा करंजीसारखा दिसणारा एक पदार्थ) आणि अन्य पदार्थ बनवून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखवायचा.’

२. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ चालू असल्याने ग्रंथांशी संबंधित सेवा करण्यास प्राधान्य देण्याचा विचार करणे

लक्ष्मीपूजनाच्या ३ दिवस आधी एक सत्संग झाला आणि त्यात सध्या चालू असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत ग्रंथांशी संबंधित सेवा प्राधान्याने करायची असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा मी विचार केला, ‘आता मला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साग्रसंगीत स्वयंपाक करणे शक्य होणार नाही. त्यामुळे केवळ पुरण बनवायचे आणि अन्य पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकत नसल्याने देवीची क्षमा मागायची.’

३. लक्ष्मीदेवीने सूक्ष्मातून ‘तू जी ग्रंथांची सेवा करशील, तोच माझ्यासाठी नैवेद्य असेल, तू पुरण बनवण्यात वेळ वाया घालवू नकोस’, असे सांगणे

तेव्हा लक्ष्मीदेवी सूक्ष्मातून माझ्यासमोर आली आणि मला म्हणाली, ‘तू जी ग्रंथांशी संबंधित सेवा करशील, तोच माझ्यासाठी नैवेद्य असेल.’ तेव्हा मला प्रश्न पडला, ‘देवीने असे का म्हटले असावे ?’ थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले, ‘नैवेद्य बनवणे’ हे ‘व्यष्टी साधने’च्या अंतर्गत येते, तर ‘ग्रंथांशी संबंधित सेवा’ ही ‘समष्टी साधना’ आहे. देवतांनाही ‘साधकांनी समष्टी साधनेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे’, असे वाटते.’

‘हे गुरुमाऊली, आपण ही अनुभूती देऊन माझ्यावर कृपा केली. मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक