-
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन
-
गोरगरीब जनता गुढ्या-तोरण बांधतील !

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) – कोरोना विषाणू मी नष्ट केला आहे, तसेच भारतात समान नागरी कायदा येईल आणि गोरगरीब जनता गुढ्या-तोरण बांधतील, असे आशीर्वचन श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाने भक्तांना भाकणुकीत दिले. याचसमवेत ‘जगाला तापमानवाढीचा धोका भेडसावेल, जंगलांना आग लागून वन्यजीव-वन्य औषधे पृथ्वीवरून नष्ट होतील’, असे सांगून येणार्या आपत्काळाविषयीही सूचित केले.
ही भाकणूक १४ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ४.१५ वाजता पू. सिद्धार्थ (पू. भगवान डोणे महाराज यांचे चिरंजीव) डोणे महाराज (वाघापुरे) यांच्या माध्यमातून सांगण्यात आली. या भाकणुकीत, ‘महाराष्ट्र राज्यामध्ये नदीजोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल. नंदनवन होईल, पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल, भगवा झेंडा राज्य करील, शत्रूराष्ट्र चीन भारतावर आक्रमण करील, भारत-पाक सीमेवर रण चालेल, स्त्रीवर्ग राजकारणात बाजी मारेल, संप हरताळाची पाळी देशावर येईल, मुसलमान राष्ट्रे उद्ध्वस्त होतील’, यांसह अनेक गोष्टींविषयी भाकिते वर्तवण्यात आली आहेत.
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाची भाकणूक वाचण्यासाठी येथे क्लिक करा !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !