वर्ष २०४७ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ३० ट्रिलीयन डॉलर होईल ! – पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल

मुंबई – उद्योगांच्या वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा झाल्या आहेत. महाराष्ट्र हे वेगाने विकसित होणारे राज्य आहे. राज्यात मेट्रो, ट्रान्स हार्बर, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. त्यामुळे ‘लॉजिस्टिक’चा खर्च अल्प होण्यास साहाय्य होणार आहे. वर्ष २०४७ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ३० ट्रिलीयन डॉलर होईल, असे वक्तव्य केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केले. ते मुंबई येथे आयोजित एन्.आय.सी.डी.सी. गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत बोलत होते. ‘महाराष्ट्र औद्यागिक टाऊनशिप लिमिटेड’ने या परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेला उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या साहाय्याने उत्तम पायाभूत सुविधा राज्यात निर्माण केल्या आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे. उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर ‘पॅकेज’ सिद्ध आहे. संभाजीनगर येथे ‘ओरिक सिटी’मध्ये एक उत्तम परिसंस्था निर्माण केली आहे.  या ठिकाणी ‘प्लग आणि प्ले यांसारख्या सुविधा आहेत. येथे जागा अपुरी पडेल इतका प्रतिसाद आहे.