सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
आर्त प्रार्थना ही गुरुचरणांसी ।
देई आश्रय
आपल्या चरणांशी ।। १ ।।
जीव गुंततो या संसारसागरी ।
देई कर मज
जाण्या पैलतिरी ।। २ ।।
माझी ही अल्प बुद्धी ।
ओळखत नाही
तुझ्या रूपासी ।। ३ ।।
साधकांच्या रूपातूनी ।
असता तुम्ही माझ्या संगती ।। ४ ।।
‘आपल्या चरणांविना नाही मुक्ती’ ।
हीच जाणीव राहो मम हृदयी ।। ५ ।।
माझी पापे अनंत असती ।
याच जन्मी त्यातून मिळावी मुक्ती ।। ६ ।।
षड्रिपूंचे ओझे शिरावरी ।
त्याचे निर्मूलन करण्या द्यावी मज शक्ती ।। ७ ।।
नसे माझे काही या जगती ।
तुम्हीच आहात माझे सर्वस्व ।। ८ ।।
तव चरणांची धूळ बनूनी ।
रहावे वाटे सर्वस्व अर्पूनी ।। ९ ।।
‘तूच उद्धरी या जिवासी’ ।
हीच प्रार्थना तव चरणांसी ।। १० ।।
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (१९.७.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |