तणाव अल्प करण्यासाठी कुटुंबासमवेत जेवण करणे आरोग्यासाठी लाभदायक ! – सर्वेक्षण

नवी देहली – कुटुंबासह जेवण केल्याने तणाव न्यून होतो, असा ९१ टक्के पालकांचा विश्‍वास असल्याचे ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

१. ‘वेकफिल्ड रिसर्च’ने ‘हेल्दी फॉर गुड मुव्हमेंट’च्या अंतर्गत १ सहस्र अमेरिकी प्रौढ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात आढळून आले की, ८४ टक्के लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीसमवेत शक्य तेवढा वेळ बसून जेवण्याची इच्छा असते; कारण सरासरी प्रौढ व्यक्ती जवळजवळ एकटेच जेवतात.

२. सर्वेक्षणातील ३ पैकी २ लोकांनी सांगितले की, ते काहीसे तणावग्रस्त आहेत आणि २७ टक्के जणांनी त्यांच्यावर प्रचंड तणाव असल्याचे सांगितले. सततच्या तणावामुळे हृदयविकार आणि पक्षाघात यांचा धोका वाढतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

३. ‘जॉन्स हॉपकिन्स येथील कार्डिओलॉजी विभागा’तील सहयोगी संचालक आणि ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’चे प्राध्यापक एरिन मिकोस म्हणाले की, इतरांसमवेत जेवल्याने तणाव अल्प होण्यास साहाय्य होते, तसेच स्वाभिमानही वाढतो.

४. १० पैकी ६ लोकांचा असा विश्‍वास आहे की, जेव्हा ते इतर लोकांसमवेत जेवतात, तेव्हा ते आरोग्यासाठी लाभदायक अन्न ग्रहण करतात. तुम्ही वैयक्तिकरित्या एकत्र जमू शकत नसल्यास तेव्हा तणाव अल्प करण्यासाठी तुम्ही ‘व्हिडिओ कॉल’द्वारे एखाद्या व्यक्तीसमवेत जेवण करू शकता.