भारत हे जगातील अव्वल ‘स्टार्टअप्स’ केंद्रांपैकी एक ! – पंतप्रधान मोदी

(स्टार्टअप म्हणजे नवा उद्योग)

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारत हे जगातील अव्वल ‘स्टार्टअप्स’ केंद्रांपैकी एक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ‘जागतिक भू-स्थानिक आंतरराष्ट्रीय काँग्रेस’ला संबोधित करतांना म्हटले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘आम्ही अंत्योदय  व्हिजनवर काम करत आहोत, म्हणजे कार्य योजनेमध्ये शेवटच्या माणसाला सक्षम बनवणे हा उद्देश आहे. विकासात एकही गाव शिल्लक राहू नये.’’ ते पुढे म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी जगाने एकत्र यायला हवे, हे कोरोना साथीच्या वेळी आपण शिकलो.

‘वर्ष २०२१ पासून आपण ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ची संख्या जवळजवळ दुप्पट केली आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासात तंत्रज्ञान आणि प्रतिभा हे दोन स्तंभ महत्त्वाचे आहेत. तंत्रज्ञान हा पालटाचा आधार आहे’, असेही मोदी यांनी सांगितले.