|
मुंबई – दिग्दर्शक साजिद खान याने मला माझा ‘टी शर्ट’ काढायला सांगितला होता, असा गंभीर आरोप अभिनेत्री कनिष्का सोनी यांनी खान याच्यावर केला. याविषयी सोनी यांनी सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. साजिद खान याच्या ‘बिग बॉस १६’ कार्यक्रमातील सहभागावरून त्याला जोरदार विरोध केला जात आहेत. खान याच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे आरोप झाले आहेत. सध्या विदेशात असलेल्या कनिष्का सोनी यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतः स्वतःशीच लग्न केल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
Sajid Khan Controversy: साजिद खान की बढ़ी मुश्किलें, एक्ट्रेस ने जान से मारने का लगाया आरोप; रातों रात देश छोड़ने पर हुई मजबूर https://t.co/mX2INDt3jT
— हिंदुस्तान न्यूज़ (@hindustannews05) October 11, 2022
या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की,
१. वर्ष २००८ मध्ये साजिद खान याने मला त्याच्या घरी बोलावले होते. त्याने मला त्याच्या चित्रपटात काम देण्याचे वचन दिले होते. मी त्याच्या घरी गेल्यावर तेथे त्याने मला माझे पोट दाखवायला सांगितले. यानंतर त्याने मला माझा टी शर्ट काढायला सांगितला होता.
२. सध्या तो ‘बिग बॉस १६’ मध्ये सहभागी झाल्याचे मला समजले. ‘मी त्याच्याविषयी उघडपणे सर्व सांगावे’, अशी माझे कुटुंब आणि मित्र परिवार यांची इच्छा आहे. त्यानुसार मी हे सांगत आहे.
३. कामाच्या बदल्यात त्याला माझा अपलाभ घ्यायचा होता. हे सांगायला मला भीती वाटत आहे; कारण मला माहिती आहे की, तो एक मोठा माणूस आहे. त्याची पोच वरपर्यंत आहे. तो काहीही करू शकतो. तो माझी हत्याही करू शकतो. तथापि एक दिवस मला निश्चितच न्याय मिळेल.
४. ‘‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार्यांचे चारित्र्य पाहिले जात नाही का ?’, असा प्रश्न मला हा कार्यक्रम आयोजित करणारे अभिनेते सलमान खान यांना विचारायचा आहे.
संपादकीय भूमिका
|