मॉस्को (रशिया) – रशिया आणि त्याच्या कह्यातील क्रिमिया यांच्यामधील कर्च पुलावर झालेला स्फोट, हे युक्रेनने केलेले आतंकवादी आक्रमण आहे, असा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला. त्यांच्या गुप्तचर विभागाने योजनाबद्धरित्या हे आतंकवादी आक्रमण घडवून आणले. यामागे नागरिकांसाठी महत्त्वाचा असणारा पूल पाडणे हाच उद्देश होता, असे पुतिन यांनी म्हटले आहे. या स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झालाा, तर येथून जाणार्या रेल्वे गाडीला आग लागली होती. रशियाने वर्ष २०१४ मध्ये क्रिमियावर नियंत्रण मिळवलेले आहे.
Vladimir Putin calls blast on Crimea-Russia bridge an ‘act of terror’ https://t.co/ozzSccjE6F
— Guardian US (@GuardianUS) October 10, 2022
युक्रेनच्या या आक्रमणाचा सूड उगवण्यासाठी रशियाने युक्रेनवर ७५ क्षेपणास्त्र डागल्याचे म्हटले जात आहे.