हलाल प्रमाणपत्र सक्ती विरोधी परिषदेचा आरंभ श्री गणेशश्लोकाने करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यांना वंदन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी ध्वनीचित्रणाच्या माध्यमातून आपले विचार मांडले. हलाल अर्थव्यवस्थेची भीषणता दर्शवणारा ‘हलाल अर्थव्यवस्था – एक आर्थिक संकट’ हा चलचित्रपट उपस्थितांना दाखवण्यात आला. इंग्रजांनी लादलेले शस्त्र बाळगण्यावरील निर्बंध हटवण्यात यावे, यासाठी वर्ष १९३८ मध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढली होती. यासाठी सावरकरांनी संकलित केलेले वीरश्री निर्माण करणारे शस्त्रगीत याप्रसंगी सादर करण्यात आले. कार्यक्रमाची पुढील दिशा आणि या परिषदेच्या ठरावांचे समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी वाचन केले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम् ।’ने करण्यात आली. सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक कुणाल रेगे यांनी केले.
परिषदेचे थेट प्रक्षेपण कर्नाटक आणि देहली येथेही ठिकठिकाणी दाखवण्यात आले. |
आता हलालला झटका देण्याची वेळ ! – यशवंत किल्लेदार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
भारतीय अर्थव्यवस्था इंग्रजांनी व्यापाराच्या नावाखाली कह्यात घेतली. त्याची पुनरावृत्ती हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली करण्यात येत आहे. हलालने मांसाहारामधून शाकाहारात घुसखोरी केली आहे. हलाल हे मुसलमानांपर्यंत मर्यादित हवे, त्याची सक्ती हिंदूंवर का ? हलालमागे मोठे षड्यंत्र आहे. त्याला आता झटका देण्याची आणि ‘खळ्खट्याक’ करण्याची वेळ आली आहे. हलालला विरोध करण्यासाठी मनसे सदैव सिद्ध आहे. आमचे नेते राजसाहेब ठाकरे हे हलालविरोधात पाठीशी उभे रहातील. त्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय व्यासपीठ वापरून मोहीम राबवली, तरच हलाल विरोधात यश मिळेल !
…तर आम्ही त्रिशूळ प्रमाणपत्र देऊ ! – विजय जंगम, वीरशैव लिंगायत महासंघ
मुसलमानांनी अगोदर लव्ह जिहाद, शैक्षणिक जिहाद, लँड जिहाद आणि आता ‘हलाल जिहाद’ चालू केले आहे. वर्ष २०४७ पर्यंत भारताला मुसलमान राष्ट्र बनवण्याचे हे षड्यंत्र चालू असल्याचे नुकत्याच एका कारवाईतून उघड झाले आहे. हलालला रोखण्यासाठी आम्हाला ‘त्रिशूळ’ प्रमाणपत्र देण्यास सरकारने अनुमती द्यावी.
हिंदूंनी हलालऐवजी झटका पद्धतीचा मांसाहार घ्यावा ! – विवेक घोलप, महाराष्ट्र प्रभारी, अखिल भारतीय खाटिक समाज
हलाल प्रमाणपत्राच्या सक्तीविषयीविषयी हिंदु नागरिक अनभिज्ञ आहेत. हिंदूंनी या हलालला विरोध करावा. हलाल म्हणजे काय आणि त्याचे दुष्परिणाम यांविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. हलालमुळे हिंदु खाटिकांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. हिंदूंनी हलालऐवजी झटका पद्धतीचा मांसाहार घ्यावा.
हिंदु समाजातील भगवान परशुराम कधी जागणार ? – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, संस्थापक, परशुराम तपोवन आश्रम, मेढे (वसई)
आम्हा सर्वांना हिंदु राष्ट्र हवे आहे आणि आम्ही अजूनही निरनिराळ्या जिहाद्यांची सूची वाचत बसलो आहोत. शेकडो वर्षांपासून हिंदू बचावाच्या पावित्र्यात राहिला आहे. आता आपल्यातील भगवान परशुराम जागा करणे आवश्यक आहे. संस्कृती आणि संस्कार यांनीच खरे राष्ट्र घडते. त्यामुळे हिंदूंनी आपल्यातील भगवान परशुराम जागवून सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा. असे केल्यास सर्व प्रकारचे जिहाद आपसूकच नष्ट होतील.
हलालला संपवण्याचे आम्ही ठरवले आहे ! – संतोष गुप्ता, झटका व्यावसायिक महासंघ
देवनारमध्ये आरंभी ३५० खाटिक झटका पद्धधतीने मांस विक्री करणारे होते, त्यांची दुकाने आज पूर्णतः बंद झाली आहेत आणि त्याची जागा हलाल मांस विक्रीच्या दुकानांनी घेतली आहे. आता आम्ही सर्वदृष्ट्या अभ्यास करून या व्यवसायात उतरलो असून सर्व प्रभागांत आम्ही या झटका पद्धधतीचेच मांस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करत आहोत. हलालला संपवण्याचे आम्ही ठरवले आहे.
हलाल प्रमाणपत्रावर बंदी आणण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणावा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, लोकप्रसिद्ध व्याख्याते आणि ज्येष्ठ पत्रकार
भारतात हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली गुंडगिरी चालू आहे. पतंजली आस्थापनालाही त्यांची उत्पादने विकण्यासाठी हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. ही गुंडगिरी सरकारने वेळीच रोखावी. भारतातील हिंदूंनी हलाल वस्तूंवर बहिष्कार घालावा. भारत सरकार एखाद्याला हलाल प्रमाणपत्र देण्यास आणि पैसेवसुली करण्यास अनुमती कशी देऊ शकते ? हलाल प्रमाणपत्रावर बंदी आणण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव टाकावा.
हलालचे षड्यंत्र मोडू शकतो ! – मोतीलाल जैन, अध्यक्ष, सुवर्णकार फेडरेशन
ताकद हवी, तर संघटन हवे; मात्र आम्ही ८० टक्के हिंदू अजूनही २० टक्के अन्य धर्मियांना घाबरून जातो. ऑस्ट्रेलियासारख्या छोट्या देशात रस्त्यावर नमाज वाचता येत नाही. भारतातही असे व्हावे म्हणून हिंदूंनी आपली ताकद वाढवावी. संघटन करावे, ते वाढवावे, तरच आपण हलालरूपी षड्यंत्र हाणून मोडू शकतो.
सरकारी प्रमाणपत्र असल्यावर खासगी प्रमाणपत्रांची आवश्यकता काय ? – डॉ. सच्चिदानंद शेवडे, व्याखाते आणि प्रवचनकार
लोकांना आपल्याच धर्माच्या पद्धधतीची उत्पादने घ्यायला बाध्य करणे, हा बहुसंख्यांक हिंदूंचा अवमान आहे; कारण सरकारी प्रमाणपत्र घेतल्यावर इतर खासगी लोकांची प्रमाणपत्र का घ्यावी ? अशांवर हिंदूंनी का विश्वास ठेवावा ? हे हलालवाल्यांचे दोन प्रतिनिधी आस्थपनात नेमणे, हे प्रश्नचिन्ह उपस्थित करते. त्यामुळे यावर सरकारने उचित निर्णय घ्यावा.
हलालविरोधी परिषदेतील प्रस्ताव
|