जखाऊ (गुजरात) – येथील समुद्रात पाकिस्तानच्या नौसैनिकांनी भारतीय मासेमार्यांच्या एका नौकेवर नियंत्रण मिळवून त्यावरील ७ मासेमारांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली आणि नंतर सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २० ते २५ पाक नौसैनिकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. अपहरणाच्या वेळी नौसैनिकांनी नौकेवर गोळीबार केल्याने तिची हानी झाली आणि ती बुडण्याच्या स्थितीत आली होती. ६ ऑक्टोबरला ही घटना घडली. मारहाणीत भारतीय मासेमारांना दुखापती झाली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ पाकच्या नौसैनिकांनी बनवला. भारतीय तटरक्षक दलाने या मासेमारांना पुन्हा भारतीय किनार्यावर आणले.
संपादकीय भूमिका
|