भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी ! – पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

सोलापूर – शहर उत्तर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजय देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे दिली आहे. यामुळे शहरात खळबळ माजली आहे. याविषयी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्याच मासात देशभरात पी.एफ्.आय. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या देशविघातक संघटनेच्या ठिकठिकाणच्या कार्यालयांवर, तसेच कार्यकर्ते रहात असलेल्या घरांवर धाडी टाकून अनेकांची धरपकड केली होती. तसेच ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्यात आली आहे.

महंमद शफी बिराजदार (रा. सहारानगर, नई जिंदगी, मजरेवाडी, सोलापूर) याने स्वतःच्या हस्तलिखितमध्ये १ ऑक्टोबर या दिवशी आमदार विजय देशमुख यांना पोस्टाने पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये पी.एफ्.आय. या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ भाषा वापरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्राची पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी गांभीर्याने नोंद घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.

संपादकीय भूमिका

  • आमदारांना जिवे मारण्याची धमकी येते, तिथे सामान्य जनता सुरक्षित असेल का ?
  • ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घातलेली असतांना तिचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधींनाच धमकीचे पत्र देतात, हे पोलिसांना लज्जास्पद ! हे पत्र पाठवणार्‍यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक !