उज्जैन (मध्यप्रदेश) येथे हिंदु नाव धारण करून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

प्रतीकात्मक छायाचित्र

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथे सद्दाम नावाच्या मुसलमान तरुणाने ‘सोनू’ असे हिंदु नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिची छेडछाड काढली. ‘हा तरुण मुसलमान आहे’, असे या तरुणीला ठाऊक झाल्यावर तिने त्यांच्याशी संभाषण करणे बंद केले. त्यामुळे सद्दाम या तरुणीला धमकावू लागला. याची माहिती तरुणीने पालकांना आणि हिंदू संघटनांना दिली. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला पकडून तरुणीच्या घरी नेऊन चोपले. त्यानंतर पोलीस ठाण्यात त्याच्याविषयी तक्रार केल्यावर पोलिसांनी सद्दाम याला अटक केली.

संपादकीय भूमिका

  • मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात आला असला, तरी मुसलमान तरुण त्याला न घाबरता हिंदु तरुणींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता त्यापेक्षाही कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने विचार करणे आवश्यक !