मंदिराच्या पायर्‍यांवर चित्रपटातील गाण्यावर अश्लील व्हिडिओ बनवणार्‍या तरुणीची क्षमायाचना

बजरंग दलाने विरोध करत सामाजिक बहिष्कार घालण्याची केली होती मागणी !

छतरपूर (मध्यप्रदेश) – येथील लवकुशनगरामधील प्रसिद्ध बम्बरबैनी मंदिरामध्ये एका चित्रपटाच्या गाण्यावर व्हिडिओ बनवण्यात आला असून त्याला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. तसेच व्हिडिओ बनवणार्‍या तरुणीवर सामाजिक बहिष्कार घालण्याची मागणी केली. तसेच क्षमा मागितली नाही, तर पोलिसांत तक्रार करण्याची चेतावणी दिली होती. यानंतर व्हिडिओ बनवणार्‍या तरुणीने सामाजिक माध्यमांवरून क्षमा मागितली आहे. मिश्रा कुटुंबातील या मुलीने ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्यावर मंदिराच्या पायर्‍यांवर अश्लील चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ बनवला होता आणि तो इंस्टाग्राम खात्यावर अपलोड केला होता. जेव्हा चित्रीकरण चालू होते, तेव्हा पायर्‍यांवरून भाविक मंदिरात जात होते.