सुरतमध्ये रुग्णवाहिकेत सापडल्या २५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा !

नोटांवर ‘चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी’ असा उल्लेख

सूरत (गुजरात) – येथील पोलिसांनी एका रुग्णवाहिकेतून २ सहस्र रुपये मूल्याच्या २५ कोटी रुपयांच्या बनावट नोटांनी भरलेली खोकी जप्त केली आहेत. या सर्व नोटांवर ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ऐवजी ‘रिव्हर्स बँक ऑफ इंडिया’ असे लिहिले होते. यासह  त्यावर ‘केवळ चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी’ असेही लिहिण्यात आले आहे. याप्रकरणी  रुग्णवाहिकेच्या चालकाची अधिक चौकशी चालू आहे.

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जर त्याचा वापर करायचा असेल, तर तो चित्रपट कोणता आणि चित्रीकरण कुठे चालू आहे ? आणि बनावट नोटा रुग्णवाहिकेतून का नेल्या जात होत्या ?आदींचेही अन्वेषण पोलीस करत आहेत.