उधमपूरमध्ये (जम्मू-काश्मीर) २ बसगाड्यांमध्ये स्फोट

दोन जण घायाळ

बसगाड्यांमध्ये झालेले स्फोट

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – उधमपूरमध्ये ८ घंट्यांच्या काळात दोन वेगवेळ्या ठिकाणी बसगाड्यांमध्ये २ स्फोट झाले. पहिला स्फोट २८ सप्टेंबरच्या रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास डोमेल चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये झाला. यामध्ये २ जण घायाळ झाले. दुसरा स्फोट २९ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता जुन्या बसस्थानकावर उभ्या असलेल्या अन्य एका रिकाम्या बसमध्ये झाला. या स्फोटात कुणीही घायाळ झाले नाही. पोलीस या घटनांची चौकशी करत आहेत. गृहमंत्री अमित शहा ४ ऑक्टोबरला जम्मूच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यापूर्वी अशा घटना घडवून तणाव निर्माण करण्याचा आतंकवाद्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.