साधकांना घडवण्याचे कार्य चैतन्याच्या स्तरावर करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून भगवंत साहाय्य करत आहे’, याची प्रचीती येणे

श्री. शंकर नरुटे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भगवंताच्या अनुसंधानात आणि सतत शिकण्याच्या स्थितीत राहून अनेक गुण आत्मसात् केले आहेत. परात्पर गुरुदेव त्यांना साधनेच्या दृष्टीने मार्गदर्शन करतात. ‘त्यांच्यात भगवंत सामावला आहे’, असे लक्षात येते. प्रत्येक साधक ‘त्यांच्या माध्यमातून भगवंत साधकांना साहाय्य करत आहे’, याची प्रचीती घेत आहे. यातून ‘भगवंत द्यायला कधीच अल्प पडत नाही. आपण घ्यायला अल्प पडतो’, हे सूत्र लक्षात येते.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यामध्ये सर्व देवींची रूपे सामावलेली असणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील गुरुकार्याची प्रचंड तळमळ आणि शिकण्याची वृत्ती यांमुळे त्यांनी अनेक गोष्टी आत्मसात केल्या आहेत. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या नावातच त्यांची शक्ती आहे’, हे साधकांनी अनुभवले आहे. श्रीसत्‌शक्ति, म्हणजेच सर्व देवींची रूपे त्यांच्यात सामावली आहेत. प्रत्येक शक्तीचा (देवीचा) अवतार विशिष्ट कार्यासाठी होतो. सर्व देवींनी या कलियुगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या रूपात पृथ्वीतलावर अवतार घेतला आहे. सर्व देवींनी एकत्रित येऊन श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून कार्य करायचे ठरवले आहे. (‘महर्षींनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा जन्म दैवी असल्याचे सांगितले आहे.’ – संकलक)

भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधकांना मार्गदर्शन करणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये देवता सामावल्या आहेत; म्हणून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ व्यापक स्तरावरील कार्य करत आहेत. आतापर्यंत त्या अनेक यज्ञांना उपस्थित राहिल्या आहेत. त्या साधकांना व्यष्टी-समष्टी साधनेसाठी मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे अनेक जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत. त्या रामनाथी आश्रमात राहून भाववृद्धी सत्संग आणि अन्य सत्संग यांच्या माध्यमातून साधकांना मार्गदर्शन करत आहेत. त्या अनेक साधकांच्या लहान-मोठ्या अडचणी सोडवून त्यांना साधनेची दिशा देत आहेत. – श्री. शंकर नरुटे

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधकाला साधना करण्याची चेतना मिळणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ या महान विभूती आहेत. ‘देवतांनी कार्य केले, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे समष्टीचे कार्य चालू आहे’, याची प्रचीती आपल्याला येते. अनेक साधकांनी ‘त्यांना व्यष्टी आणि समष्टी साधनेत येणार्‍या लहान-मोठ्या अडचणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडे गेल्यावर काही क्षणांतच योग्य दिशा मिळून सुटतात’, अशी अनुभूती घेतली आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सूत्र दिल्यावर त्यातील ९० टक्के साधनेविषयी अडचणी लगेच सुटतात, म्हणजे ‘त्यांचे स्मरण झाल्यावरच अडचणीचे निराकरण होत आहे’, याची साधकांना प्रचीती येते. त्यांचे स्मरण, म्हणजेच त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलण्यासारखे आहे. यातून ‘त्यांचे सूक्ष्मातून कार्य चालू आहे’, असे लक्षात येते. त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधकांना साधना करण्याची चेतना मिळते. त्या चेतनेच्या बळावर तो साधक आपोआप साधनेत पुढे जातो. साधक याचीही प्रचीती घेत आहेत.

साधकांकडून विविध सेवांतील सूत्रे जिज्ञासेने जाणून घेणे

श्री. सत्यकाम कणगलेकर यांच्याकडून छायाचित्रकाविषयी जिज्ञासेने जाणून घेतांना …

६.१०.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील चित्रीकरण कक्षासाठी नवीन छायाचित्रक खरेदी करण्यात आले. त्याचे पूजन झाल्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी चित्रीकरणाची सेवा करणारे साधक श्री. सत्यकाम कणगलेकर यांच्याकडून छायाचित्रकाविषयी जिज्ञासेने जाणून घेतले.

विविध सेवांतील बारकावे शिकण्याच्या स्थितीत राहून जाणून घेणे, हे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे एक निराळे वैशिष्ट्य आहे !

४. मार्गदर्शनामुळे साधक पुढच्या टप्प्याला जात असणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ एखाद्या साधकाला बोलण्यासाठी वेळ देतात. ती वेळ साधकाच्या दृष्टीने ईश्वरी नियोजनाप्रमाणे ठरलेली असते. त्या वेळी त्या साधकाला साधनेसाठी जे आवश्यक आहे, ते भगवंत आपोआप देतो. साधकाला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ योग्य वेळ आल्यावरच त्या भेटतात. तेव्हा त्या साधकाचे साधनेच्या दृष्टीने योग्य ते चिंतन झालेले असते. त्यामुळे ‘तो साधक सहजतेने श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी बोलल्यावर साधनेत पुढच्या टप्प्याला जातो’, असेही साधकांनी अनुभवले आहे.

– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१०.२०२०)

त्या भगवंताचे रूप असूनही साधकांना सूत्रे सांगतांना ‘यात काही चुकले आहे का ? आणखी कसे असायला हवे ?’, असे विचारतात. साक्षात् भगवंत आपल्या स्तराला येऊन विचारतो, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे ! – श्री. शंकर नरुटे 

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक