कर्णावती (गुजरात) – दक्षिण गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील धरमपूरमधील करचोड गावातील विद्यार्थिनींच्या वसतीगृहात त्यांची अश्लील छायाचित्रे काढल्याची आणि व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. पालकांकडून येथील स्वयंपाक्याच्या विरोधात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. या वसतीगृहात गरीब आदिवासी कुटुंबातील मुली रहातात आणि शिक्षण घेतात.
चंडीगढ़-मुंबई के बाद गुजरात में भी छात्राओं के नहाते समय फोटो खींचे, बनाया वीडियो, रसोइए पर आरोप #news #dailyhunt https://t.co/RwNkn7qJYI
— Dailyhunt Hindi (@DH_Hindi) September 22, 2022
विद्यार्थिनींनी सांगितले की, या वसतीगृहातील स्नानगृहाच्या तुटलेल्या खिडकीतून या स्वयंपाक्याने त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि त्याआधारे त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच छेड काढण्याचाही प्रयत्न केला.
संपादकीय भूमिका‘अशा घटना देशातील अन्य वसतीगृहात होत नाहीत ना ?’, याची आता देशपातळीवर चौकशी होण्यासाठी प्रत्येक राज्यातील सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |