१. भृगु महर्षींनी पितरपूजन आणि तर्पणविधी करण्यास सांगणे
‘सनातनच्या सर्व साधकांच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी’, यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पितरपूजन करावे’, असे भृगु महर्षींनी चेन्नई येथील नाडीपट्टी वाचनाद्वारे सांगितले होते. त्यानुसार १९.२.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात सद्गुरुद्वयींनी संकल्पपूर्वक पितरपूजन केले आणि पू. पृथ्वीराज हजारे यांनी तर्पणविधी केला.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘पितरपूजन आणि तर्पणविधी’ याविषयीचा लेख वाचल्यावर कृतज्ञता वाटणे
‘२१.९.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पृष्ठ क्र. ५ वर ‘पितरपूजन आणि तर्पणविधी’ या विषयीच्या संशोधनावर आधारित लेख प्रसिद्ध झाला. त्यातील सूत्रे वाचल्यावर मला महर्षि भृगु, परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. पृथ्वीराज हजारे यांच्याबद्दल अत्यंत कृतज्ञता वाटली.
३. आगामी काळात येऊ शकणार्या प्रतिकूल परिस्थितीमुळे साधकांना श्राद्धविधी करणे कठीण असल्याचे जाणून महर्षि भृगु यांनी साधकांना श्राद्धविधीच्या चिंतेतून मुक्त करणे
महर्षि भृगु यांनी येणार्या काळाची पावले ओळखून सनातनच्या सर्व साधकांच्या पूर्वजांना मुक्ती मिळण्यासाठी आधीच पितरपूजन आणि तर्पणविधी करून घेतला. याचे कारण ‘वर्ष २०२० पासून चालू झालेली ‘कोरोना महामारी’ आणि पुढे लवकरच होऊ शकणारे तिसरे महायुद्ध यांमुळे जी परिस्थिती उद्भवेल, त्यामुळे साधकांना आपल्या पूर्वजांसाठी श्राद्धविधी करता येणार नाहीत’, हे महर्षि भृगु जाणून होते; म्हणूनच त्यांनी सर्व साधकांना श्राद्धविधीच्या चिंतेतून मुक्त केले.
कृतज्ञता !
महर्षि भृगु आणि आम्हा साधकांच्या साधनेतील सर्व अडथळे अन् त्रास नष्ट होण्यासाठी वेळोवेळी जे ऋषिमुनी, संतमहात्मे आमच्यावर कृपा करतात, त्या सर्वांच्या परम पवित्र चरणी आम्ही सर्व साधक अत्यंत कृतज्ञ आहोत.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले, ‘केवळ आणि केवळ आपल्याच कृपेने आम्हा सर्व साधकांच्या पूर्वजांना मुक्ती मिळण्यासाठी महर्षि भृगु धावून आले. त्यांचा संकल्प आणि तुमचे आशीर्वाद यांमुळे साधकांच्या पूर्वजांना मुक्ती मिळण्यासह आम्हा सर्वांना आपण श्राद्धविधीच्या चिंतेतूनही सदासाठी मुक्त केलेत ! त्याबद्दल हे प्रभु, तुमच्या परम पावन चरणी आम्ही सर्व साधक कोटीशः कृतज्ञ आहोत.’
श्री गुरुचरणी शरणागत, – श्रीमती कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(२३.९.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |