कोळनूर (जिल्हा लातूर) येथील मंदिराची दानपेटी अज्ञात व्यक्तीने फोडली !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

प्रतीकात्मक छायाचित्र

लातूर – जळकोट तालुक्यातील मौजे कोळनूर येथील महादेव मंदिरातील दानपेटी अज्ञात व्यक्तीने फोडली. चोरीच्या प्रकरणी वैजनाथ हात्ते यांनी जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, अज्ञात व्यक्तीने महादेव मंदिरातील दानपेटी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत नेऊन तोडली. त्यातील अंदाजे १० सहस्र रुपये चोरून नेले आहेत. अज्ञात व्यक्तीविरुद्ध जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.