साधकांना सूचना
‘कोरोना महामारीच्या काळात ‘दळणवळण बंदी’ लागू झाल्यापासून साधक पहाटे लवकर उठून ‘ऑनलाईन’ एकत्र येऊन किंवा वैयक्तिकरित्या नामजप करत आहेत.
साधकांनी नामजपाचे नियोजन करतांना पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
१. ज्या साधकांना पहाटे लवकर उठून नामजप करणे शक्य आहे, तसेच त्या वेळेत नामजप केल्याने दिवसभर उत्साह वाटतो, मन सकारात्मक रहाते इत्यादी लाभ होतात, त्यांनी पहाटे नामजप करणे चालू ठेवावे.
२. काही साधकांना स्वतःचा दिनक्रम, प्रकृती किंवा अन्य अडचणी यांमुळे पहाटे लवकर उठून नामजप करणे शक्य होत नाही, त्यांनी दिवसभरात आपल्या सोयीच्या वेळेत भावपूर्ण नामजप केल्यास त्याचा आध्यात्मिकदृष्ट्या तेवढाच लाभ होईल.
३. दिवसेंदिवस आपत्काळाची तीव्रता आणि वातावरणातील रज-तम वाढत आहे. आपत्काळाचा सामना करत भवसागरातून तरून जाण्यासाठी नाम हाच आधार असल्याने साधकांनी प्रतिदिन भावपूर्ण नामजप करून आध्यात्मिक बळ वाढवावे. साधकांनी नामजपाचा आढावा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधकास द्यावा.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१९.९.२०२२)