बेळगाव (जिल्हा बीड) येथील बेलेश्‍वर मंदिरात चोरी !

प्रतिकात्मक छायाचित्र

बीड – येथील बेळगाव तालुक्यातील बेलेश्‍वर मंदिरात महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूच्या मुकुटासह, पिंडीवरील चांदीची शेषनागाची मूर्ती चोरीला गेली आहे. २० सप्टेंबर या दिवशी पुजारी मंदिरात गेले असता मंदिराचे कुलूप तुटलेले आणि गाभार्‍याचे दार उघडे असलेले दिसले. मंदिरातील दानपेटी चोरण्याच्या घटना या पूर्वीही २-३ वेळा घडल्या आहेत; मात्र गाभार्‍यात चोरी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मंदिरात पूजेसाठी नित्यनेमाने येणारे महंत महादेव भारती महाराज यांनी सांगितले. (एका मंदिरात इतक्या वेळा चोर्‍या झाल्या असतांना पोलीस झोपले आहेत का ? ‘मंदिरांत चोरी करण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही’, अशी वचक पोलीस का निर्माण करत नाहीत ? – संपादक) प्रशासनाने या घटनेची तात्काळ नोंद घेऊन चोरीच्या घटनांचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (अशी मागणी करावी लागते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललेली मंदिरे !