अधिवक्ता इरशाद अलीने हिंदु असल्याचे भासवून हिंदु युवतीशी केला विवाह !

आता राजधानी देहलीत लव्ह जिहादची घटना उघड !

  • मुसलमान असल्याचे समजल्यावर धर्मांतर आणि नमाज पढण्यासाठी बनवला दबाव

  • मारहाणीमुळे पीडितेच्या शरिरावर जखमांच्या २८ खुणा, पायाचे हाड मोडल्याचे वैद्यकीय तपासणीतून उघड

  • इरशाद आधीपासून विवाहित असल्याचे आणि मुले असल्याचे आले समोर

प्रतीकात्मक छायाचित्र

देहली – येथील ज्योतीनगर भागातील पोलिसांनी लव्ह जिहादच्या एका प्रकरणामध्ये इरशाद अली नावाच्या एका अधिवक्त्याला अटक केली. आरोपी इरशाद अली याने तो हिंदु असल्याचे सांगून त्याच्याकडे वकिली कामाचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. त्यानंतर तो मुसलमान असल्याचे समोर आल्यावर तो तिच्यावर धर्मांतर, तसेच नमाज पढण्यासाठी  दबाव आणून तिला मारहाण करत असे.

१. वर्ष २०११ मध्ये आरोपी इरशाद अली याच्याकडे वकिली कामाचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या हिंदु युवतीला त्याने स्वत:चे नाव गुड्डू चौधरी असल्याचे सांगितले होते. पीडितेला यावर विश्‍वास बसावा म्हणून त्याने त्याच्या हातावर दुर्गादेवीचा ‘टॅटू’ही गोंदवून घेतला होता.

२. पुढे दोघांमध्ये प्रेम होऊन वर्ष २०१५ मध्ये त्यांनी विवाह केला. कालांतराने गुड्डू हा मुसलमान असून त्याचे नाव इरशाद अली आहे आणि त्याचा आधीपासून विवाह झाला असून त्याला मुले आहेत, हे पीडितेला कळाले. त्यानंतर ईरशाद याने तिला अनेक वेळा मारहाणही केली.

३. तिने पोलिसात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर तिच्या झालेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्या शरिरावर २८ ठिकाणी जखमा झाल्याचे, तसेच मारहाणीमुळे तिच्या पायाचे हाड मोडल्याचे समोर आले.

संपादकीय भूमिका

  • ‘मुसलमानांना मुख्य प्रवाहातील शिक्षण दिल्यानंतर त्यांच्यातील गुन्हेगारीचे प्रमाण अल्प होईल’, असा दावा करणार्‍यांना यावर काय म्हणायचे आहे ?
  • धर्मांध मुसलमान कितीही उच्चशिक्षित झाले, तरी त्यांच्यातील धर्मांधता अल्प होत नाही, हेच यातून लक्षात येते !
  • लव्ह जिहादवर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासमवेतच समान नागरी कायदा करणे आवश्यक आहे. यामुळे मुसलमान एकाहून अधिक विवाह करू शकणार नाहीत, हे लक्षात घ्या !