धार (मध्यप्रदेश) येथे अवैध दारूने भरलेला ट्रक पकडण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांवर आक्रमण

धार (मध्यप्रदेश) – धार जिल्ह्यातील कुक्षी येथे दारूने भरलेला ट्रक पकडण्यासाठी गेलेले उपविभागीय दंडाधिकारी नवजीव सिंह पंवार आणि त्यांचे पथक यांच्यावर आक्रमण करण्यात आले. या वेळी पंवार आणि नायब तहसीलदार यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. त्यांनी दारू माफियांच्या कह्यातून नायब तहसीलदार यांची सुटका केली; मात्र घटनेच्या वेळी अंधार असल्याने दारू माफिया पळून गेले. पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. पोलीस आरोपी सुखराम डाबर आणि अन्य जणांचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना दारू माफियांवर वचक निर्माण करून त्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत, असेच जनतेला वाटते !