सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘जेव्हा आपण स्वतः भाजीपाला लावतो, तेव्हा बी पेरण्यापासून भाजी मिळण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे आपण साक्षी असतो. ‘लहानशा बीपासून मोठे रोप आणि पुढे त्या रोपाला फुले अन् फळे येणे’, ही निसर्गाची किमया आपण अनुभवतो. त्या झाडाची काळजी घेतांना, तसेच त्याचे निरीक्षण करतांना नकळत आपल्या मनामध्ये त्या झाडाप्रती प्रेम आणि आपुलकी निर्माण होते. अशा प्रकारे पालनपोषण केलेल्या झाडापासून भाजीपाला मिळतो; तेव्हा आपल्या मनात कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो. या भाजीपाल्याची तुलना विकतच्या भाजीपाल्याशी होऊच शकत नाही. ‘स्वतः पिकवलेल्या भाजीपाल्याची चव किती सुरेख असते’, हे प्रत्यक्ष अनुभवल्याविना लक्षात येणार नाही. हा अनुभव घेण्यासाठी स्वतःच्या घरात न्यूनतम एका कुंडीत तरी भाजीपाल्याची लागवड करा !’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (७.८.२०२२)