जबलपूर येथील बिशप सिंह याचे दाऊद इब्राहिमच्या गुंडाशी संबंध !

(बिशप म्हणजे चर्चमध्ये वरच्या श्रेणीत कार्यरत असलेला पाद्री)

मध्यभागी बिशप पी. सी. सिंह

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील बिशप पी.सी. सिंह याच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने धाड घालून त्याच्याकडून दीड कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली होती. या प्रकरणी अधिक चौकशीत या बिशपचे संबंध आंतरराष्ट्रीय जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या जवळचा गुंड रियाज भाटी याच्याशी असल्याचे समोर आले आहे.

छत्तीसगड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन लॉरेन्स यांनी पंतप्रधान कार्यालय आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर त्याची चौकशी चालू करण्यात आली. यात मुंबईसह पंजाब, उत्तरप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश येथे त्याची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. बिशप याने मुंबई जिमखाना जवळील एका भूमीचा करार रियाज भाटी याच्याशी ३ कोटी रुपयांत केला होता. रियाज याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे या कराराची कागदपत्रे सापडली होती.

संपादकीय भूमिका

असे संबंध असल्याचा आरोप हिंदूंच्या एखाद्या संतांवर झाला असता, तर एव्हाना प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याची स्पर्धा लागली असती; मात्र येथे बिशप असल्याने सगळे शांत आहेत. हीच ‘भारतीय धर्मनिरपेक्षते’ची व्याख्या आहे !