भारताचे विभाजन करण्याचे षडयंत्र रचणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात राहुल गांधी भारताला एकत्र जोडतील का ?

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला कन्याकुमारीपासून प्रारंभ होत असतांना हिंदूंचा काँग्रेसवाल्यांना प्रश्‍न !


कन्याकुमारी (तमिळनाडू) – काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर या दिवशी प्रारंभ करण्यात आला. या यात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत आहेत. मोक्याच्या प्रसंगी पक्षाला निराधार सोडून परदेशांत जाण्याविषयी ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. काँग्रेसला रसातळाला नेण्यासाठी त्यांना उत्तरदायी ठरवले जाते. अनुमाने ३ सहस्र ५०० किलोमीटर अंतराच्या या प्रवासात राहुल गांधी कथित आर्थिक विषमता, सामाजिक भेदभाव आणि सत्तेच्या केंद्रीकरणाशी लढा देतील. कन्याकुमारतील एका पाद्रीने ‘भारतमाते’ला ‘रोग’ म्हटले होते. ‘हिंदूंना अपमानित करण्याचा पाद्रीचा हेतू होता’, असे उच्च न्यायालयानेही म्हटले होते.

कन्याकुमारीमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रकार सर्रास घडतात. ‘अशा स्थितीत कन्याकुमारीतील हिंदूंवर झालेल्या आक्रमणाच्या विरोधात काही बोलण्याचे धाडस राहुल गांधी करतील का ?’, असा प्रश्‍न हिंदूंनी उपस्थित केला आहे. ‘ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कारस्थानाच्या विरोधातील लढाईत भारताला एकत्रित करण्याचे वक्तव्य केले पाहिजे; कारण इस्लामिक कट्टरतावाद आणि ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर यांच्या विरोधात भारताला एकत्र येण्याची आवश्यकता आहे, हे आजचा भारत जाणून आहे. या  सत्याला सामोरे जाण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सिद्ध आहेत का ?’, असा प्रश्‍नही कन्याकुमारीतील हिंदूंनी विचारला आहे.