लक्ष्मणपुरीमध्ये हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत ६ जण ठार

लक्ष्मणपुरी – शहरातील हॉटेलमध्ये ५ सप्टेंबर २०२२ या दिवशी लागलेल्या भीषण आगीत ६ जण ठार, तर १० जण घायाळ झाले. हजरतगंज येथील हॉटेल ‘लेवाना’मध्ये सकाळी ६ वाजता ही आग लागली. तेव्हा हॉटेलमध्ये अनेक जण उपस्थित होते. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने, खिडकीच्या काचा तोडून काही जणांना बाहेर काढण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोचले.

सौजन्य इंडिया टीव्ही 

आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. धूर झाल्याने हॉटेलमधील अनेकांचा जीव गुदमरला. अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आतमध्ये अडकलेल्या अनेकांना सुखरूप बाहेर काढले. या आगीत घायाळ झालेल्यांना  रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.