शबाना आजमी, जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह हे ‘तुकडे तुकडे टोळी’चे स्थानिक हस्तक ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

शबाना आझमी, जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

भोपाळ (मध्यप्रदेश) – अभिनेत्री शबाना आझमी, तिचे पती आणि लेखक जावेद अख्तर, तसेच अभिनेते नसीरुद्दीन शाह हे ‘तुकडे तुकडे’ (भारताचे तुकडे करण्याची मागणी करणारे) टोळीचे ‘स्लीपर सेल’ (स्थानिक हस्तक) आहेत. जेव्हा राजस्थानमध्ये कन्हैयालाल यांची हत्या झाली, तेव्हा या लोकांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही, झारखंडच्या दुमकामध्ये मुसलमान तरुणाने हिंदु मुलीला जाळून ठार केल्यानंतरही हे लोक गप्प होते, अशी टीका मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे. गुजरात दंगलीतील बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींची शिक्षा माफ केल्यावरून शबाना आझमी यांनी टीका केली होती. त्यावर मिश्रा यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.