देवद आश्रम रामनाथी आश्रमासम करण्या ध्यास असे ज्यांना ।
परात्पर गुरु डॉक्टरांचे जे प्रतिरूप भासती साधकांना ।। १ ।।
प्रत्येक साधक अंतर्बाह्य पालटण्या चंग बांधला ज्यांनी ।
साधकांना घडविती जे व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातूनी ।। २ ।।
स्वतःच्या तीव्र शारीरिक त्रासावर मात करूनी ।
साधकांना शिकवतात, ‘देहबुद्धी विसरून जा तुम्ही’ ।। ३ ।।
‘देवाचे ध्वनीचित्रीकरण चालू आहे’ आणि ‘दिसेल ते कर्तव्य’ ।
असे विषय चिंतनास देऊनी घडवतात साधकांचे अंतर ।। ४ ।।
करण्या मुक्त प्रत्येक साधका जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून ।
धडपडतात ते अपार तहान भूक हरपून ।। ५ ।।
अनंत कोटी कृतज्ञ आम्ही गुरुदेव आपल्या चरणी ।
सद्गुरु राजनदादा (टीप १) लाभले आम्हा देवद आश्रमी ।। ६ ।।
कोटी कोटी नमन आमचे गुरुदेव (टीप २) ।
आणि सद्गुरु राजेंद्रदादांच्या चरणी ।। ७ ।।
टीप १ – सद्गुरु राजेंद्र शिंदे
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे
– श्री. शशांक जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.१.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |