सद्गुरु दादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) म्हणजे देवद आश्रमातले दुसरे परम पूज्य डॉक्टर ।

सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी

सद्गुरु दादा म्हणजे देवद आश्रमातले परम पूज्य डॉक्टर दुसरे ।
सद्गुरु दादा म्हणजे देवद आश्रमातले परम पूज्य डॉक्टरांचे प्रतिरूप ।।

स – सर्व साधकांना सतत आनंद देणारे ।
द – दमलेल्या साधकांशी (टीप १) दोन शब्द बोलून त्यांना नवचैतन्य देणारे ।
गु – गुणांचे निरीक्षण करून कौतुक करणारे ।
रु – रूप नयनी साठवावे असे दिव्य तेज असणारे ।।

रा – रागवती व्यष्टी न होता नीट तितकीच प्रीती असे अंतर्मनात ।
जें – जेथे जाती तेथे उधळण करती चैतन्य आणि उत्साह  यांची ।
द्र – द्रवतो पाझर भावाचा त्यांच्या केवळ दर्शनाने (टीप २) ।।

दा – दाविती ईश्वरप्राप्तीचा मार्ग व्यष्टी आढाव्यात ।
दा – दास्यभाव त्यांचा गुरुमाऊलींप्रती ।।

साधकांना पुढे घेऊन जाणारे हात घेऊनी हाती ।
कृपाळू प्रेमळ परम पूज्य डॉक्टर यांच्यासम भासती ।।

सर्व साधकांचे आधार, आदर्श आणि सर्व साधकांचे आवडते सद्गुरु दादा !

टीप १ – दमलेल्या साधकांशी – प्रक्रिया करतांना स्वभावदोष आणि अहं यांमुळे हरलेल्या साधकांशी

टीप २ – त्यांच्याशी बोलणे झाले नाही, तरी केवळ दर्शनाने भावजागृती होते

– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.७.२०२२)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक