हिंदु जनजागृती समिती द्विदशकपूर्ती निमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियानास आरंभ
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १ सप्टेंबर (वार्ता.) – श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी तुझा आशीर्वाद आम्हा सर्वांवर सदैव असू दे, हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी सर्वांना भक्ती, शक्ती आणि बुद्धी दे’, अशी प्रार्थना आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा हिंदु जनजागृती समिती आणि तुळजापूर येथील धर्मप्रेमी यांनी ३० ऑगस्ट या दिवशी करण्यात आली. या वेळी पुजारी आणि धर्मप्रेमी यांनी श्री तुळजाभवानी देवीची ओटी भरून आरती केली. हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मागील २० वर्षे कार्यरत आहे. या वर्षी समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने समितीने हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय अधिकाधिक व्यापक प्रमाणात समाजात पोचवण्यासाठी भवानी देवीच्या चरणी प्रतिज्ञा करून हिंदु राष्ट्र संकल्प अभियानास आरंभ केला.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे परीक्षित साळुंके, धर्मप्रेमी श्री. विजय भोसले, श्री. बालाजी नरवडे, श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी सर्वश्री शशिकांत पाटील, शिवाजी कदम परमेश्वर, दिनेश कदम परमेश्वर, कैलास कदम परमेश्वर, रुपेश कदम परमेश्वर, बाळासाहेब कदम भैय्या यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री भवानी देवीच्या चरणी ‘हिंदु संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांचे जतन-संवर्धन करीन, तसेच हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवळे, गोमाता, स्त्रिया यांचे प्राणपणाने रक्षण करीन’ अशी प्रतिज्ञा धर्मप्रेमी नागरिकांनी केली. हिंदु राष्ट्राची संकल्पना पोचवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हिंदु राष्ट्राविषयी विविध विषयांवरील व्याख्याने घेणे, मंदिर आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता मोहीम राबवणे, असे उपक्रम घेण्यात येणार आहेत.
सोलापूर येथे धर्मप्रेमींचा द्विदशकपूर्ती अभियानामध्ये सक्रीय सहभागी होण्याचा निर्धार !
सोलापूर – येथील श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी प्रार्थना करून प्रतिज्ञा करण्यात आली. या वेळी सनातन संस्थेच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्यासह प्राचार्य अभिमन्यू राघोबा, उद्योजक श्री. निवास कडवेरी, श्री. लक्ष्मण इरण्णपल्ली, श्री. मल्लीनाथ सलगर, लखपती हनुमान प्रतिष्ठानचे श्री. जानकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. विक्रम घोडके आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण करून भावपूर्ण दर्शन घेतले. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी समितीच्या द्विदशकपूर्ती अभियानामध्ये सक्रीय सहभागी होण्याचा निर्धार केला.
बीड – येथील प्रसिद्ध माळी वेस श्री हनुमान मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना आणि शपथ घेण्यात आली. या वेळी शहरातील विविध क्षेत्रांतील राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी असणारे २० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी सर्वश्री दिलीप वांगीकर, मधुकर नाईक, ऋषीकेश परदेशी, अभिजित परदेशी, पंकज अग्रवाल, मनोज छाजेड, अधिवक्ता गजानन कानिटकर नितीन सारडा, अंकित बाफना, अर्जुन साळुंके, गोमाता सेवक अनंत दिल्लीवाले समितीचे श्री. शेषराव सुसकर श्री. मनीष मोंढेकर आदी उपस्थित होते.
अंबाजोगाई (जिल्हा बीड) – येथील प्रसिद्ध श्री योगेश्वरी मंदिरात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना आणि प्रतिज्ञा करण्यात आली. प्रतिज्ञा केल्यानंतर उपस्थित काही हिंदुत्वनिष्ठांनी ‘छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासम आम्ही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु राष्ट्रवीर बनण्यास सिद्ध आहोत’, असे उत्स्फूर्तपणे सांगून घोषणा दिल्या. या वेळी सर्वश्री सुभाष महिंद्रकर, बालाजी भारजकर, संदेश काळे, अजय होळकर, संजय गिरवलकर, आकाश चौरे, संकेत लंगे, सचिन मगर, गोपाळ कुलकर्णी, नारायण शिंदे, शिवाजी काळे, दत्ता पवार, सिद्धेश्वर जाधव, सीमा काळे, सौ. आर्या केंद्रे, सौ. स्मिता हिरळकर, सौ. रोहिणी गुर्जर, सौ. सुनीता पंचाक्षरी आदी उपस्थित होते.
विशेष – अंबाजोगाई येथे प्रतिज्ञेसाठी २ श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे उपक्रम स्तुत्य आहेत. आमच्या मंडळात शौर्य जागरण व्याख्यान आणि फलक प्रदर्शन यांसह समितीचे अन्य उपक्रमही राबवू शकतो’, असे सांगितले.