धर्मांधांनी बुद्धीभेद केल्याने पत्नी आणि मुले यांनी इस्लाम स्वीकारल्याने हताश पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

कर्णावती – गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात धर्मांधांनी बुद्धीभेद केल्याने पत्नी आणि मुले यांनी इस्लाम स्वीकारल्याने हताश झालेल्या पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित सोळंकी यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांची पत्नी आणि मुले यांचा शेख कुटुंबियांनी बुद्धीभेद केला आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. या प्रकरणी सोहेल शेख आणि इतर ४ जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

१. याविषयीचे सविस्तर वृत्त असे की, सोळंकी यांची मुलगी तिच्या महाविद्यालयातील एजाज शेख नावाच्या मुसलमान तरुणाच्या संपर्कात आली होती. मुलीच्या घरच्यांनी तिच्या मैत्रीवर आक्षेप घेतल्यावर तिने त्याच्यासोबत रहाण्याचा हट्ट धरला. नंतर तिची आई आणि भाऊ यांनीही तिला साथ दिली. तिघांनीही घरी नमाज पडणे चालू केले.

२. याला त्यांच्या एकत्रित कुटुंबातील काही सदस्यांनी आक्षेप घेतल्यावर सोळंकी यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांनी घर सोडले आणि शेख कुटुंबियांच्या साहाय्याने वेगळे राहू लागले; मात्र नंतर त्यांचा शोध लागला नाही.

३. सोळंकी यांनी शेख कुटुंबियांशी बोलून त्यांची पत्नी आणि मुले यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, शेख कुटुंबियांनी पत्नी आणि मुले यांची भेट घालून देण्यासाठी सोळंकी यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. हताश झालेल्या सोळंकी यांनी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर पालनपूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • धर्मांतरामुळे हिंदूंची कुटुंबे दुभंगू नयेत, यासाठी हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !
  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच धर्मांधांच्या बुद्धीभेदाला हिंदू बळी पडतात. त्यामुळे हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याची व्यवस्था करणे आवश्यक !