सोलापूर – कोरोना महामारीमुळे मागील अडीच वर्षे बंद असलेली ‘कोल्हापूर एक्सप्रेस’ लवकरच चालू करण्यात येणार आहे. ‘कोल्हापूर एक्सप्रेस’ कलबुर्गीपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही गाडी ‘कलबुर्गी ते कोल्हापूर’ अशी धावेल. या गाडीला एकूण १३ डबे असून अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर येथे थांबे देण्यात आल्याने भक्तांची सोय होणार आहे. कोल्हापूर एक्सप्रेस कधीपासून धावेल याचे वेळापत्रक अद्याप कळवण्यात आलेले नाही. ‘कलबुर्गी-कोल्हापूर एक्सप्रेस’ला गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, कर्डूवाडी, पंढरपूर, मिरज आणि कोल्हापूर या ठिकाणी थांबे असणार आहेत. ही गाडी कलबुर्गी स्थानकावरून सकाळी ६.४० वाजता निघेल, तर सोलापूर येथे सकाळी ८.३० वाजता येईल पुढे कोल्हापूर येथे दुपारी २.१५ वाजता पोचणार आहे. दुपारी ३ वाजता कोल्हापूर येथून निघेल आणि सोलापूर येथे रात्री ९.०८ वाजता येईल. कलबुर्गीला रात्री १०.४५ वाजता पोचेल.