आसाममध्ये बाहेरून येणार्‍या इमामांना नावनोंदणी करावी लागणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारी व्यक्ती)

हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती  – आम्ही बाहेरच्या राज्यांतून आमच्या राज्यातील मदरशांत येणार्‍या इमामांसाठी एक संगणकीय प्रणाली बनवत असून त्यांवर त्यांना नावनोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली.

मुख्यमंत्री सरमा हे लोकांना उद्देशून म्हणाले, ‘‘तुमच्या गावात एखादा इमाम आला आणि तुम्ही त्याला ओळखत नसाल, तर लगेचच पोलीस ठाण्याला कळवा, जेणेकरून त्याची पोलीस शहानिशा करू शकतील. या कामात आसामचा मुसलमान समाज आम्हाला साहाय्य करत आहे.’’

आसामला ‘इस्लामिक ठिकाण’ बनवण्याचे आतंकवाद्यांचे प्रयत्न

विदेशी आतंकवादी आसामला ‘इस्लामिक ठिकाण (इस्लामिक हब) बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी अटक केलेल्या ५ बांगलादेशी आतंकवाद्यांचा सरमा यांनी या वेळी उल्लेख केला. राज्यात अटक करण्यात आलेल्या इमामांवर राज्यातील मुसलमान तरुणांना कट्टरवादी बनवण्याचा आरोप आहे. त्यांचा अल्-कायदा या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

केवळ आसामच नव्हे, सर्वच राज्यांत घुसखोरांना थारा मिळू नये, यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !