शस्त्रक्रिया झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेच्या बळावर स्थिर असणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्रीकांत शांताराम देसाई !

श्री. श्रीकांत देसाई

१. भगेंद्र (फिस्च्युला) या व्याधीसाठी शस्त्रक्रिया करणे, शस्त्रक्रियेला २ वर्षे होऊनही व्याधी बरी न होणे, त्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तीव्र प्रारब्ध असल्याचे सांगणे आणि त्यानंतर काही दिवसांनी व्याधी बरी होणे

‘मला भगेंद्र (फिस्च्युला) (टीप) ही व्याधी झाली होती. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शस्त्रक्रिया लवकर करून घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे लगेच एका आयुर्वेद महाविद्यालयात शस्त्रक्रिया केली. काही वर्षांनी पुन्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मी त्यांना सांगितले, ‘‘शस्त्रकर्म करून २ वर्षे झाली, तरी अजून माझी व्याधी बरी होत नाही.’’ तेव्हा प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) म्हणाले, ‘‘तीव्र प्रारब्ध आहे.’’ त्यानंतर  काही दिवसांनी माझी भगेंद्र (फिस्च्युला) ही व्याधी बरी झाली.

टीप – भगेंद्र (फिस्च्युला) – गुदाच्या परिसरात एकाहून अधिक तोंडे असलेला नलिकाकार व्रण

२. मोठा अपघात झाल्याने पायाचा अस्थीभंग होऊन पायावर शस्त्रकर्म होणे आणि २४ घंटे एका स्थितीतच झोपावे लागत असल्याने रात्री झोप न लागणे अन् त्यासाठी विविध उपाय करणे

१६.१०.२०२० या दिवशी एका कुत्र्याने माझ्या दुचाकी वाहनाला समोरून धडक दिल्यामुळे माझा मोठा अपघात होऊन माझ्या पायाचा अस्थीभंग (फ्रॅक्चर) झाला. त्यामुळे गोव्यातील एका रुग्णालयात माझ्या पायावर शस्त्रक्रिया झाली. मला ९ दिवस रुग्णालयात थांबावे लागले. शस्त्रक्रियेमुळे मला २४ घंटे एका स्थितीतच झोपावे लागत होते. त्यामुळे मला रात्री झोप लागत नव्हती; म्हणून मी सतत नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करत होतो, तसेच कापूर अन् अत्तर यांचेही उपाय करत होतो.

३. रात्री झोप लागत नसल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धावा करणे आणि त्यांच्या कृपेमुळे रुग्णालयातील रज-तमात्मक वातावरणाचा काहीही परिणाम न जाणवणे

रात्री झोप लागत नसल्यामुळे मला पुष्कळ त्रास व्हायचा. त्यामुळे मी प.पू. गुरुदेवांचा धावा करत होतो. त्यामुळे दिवस उजाडल्यावर आनंद जाणवायचा आणि रात्री झोप न लागल्याचा काहीही परिणाम जाणवत नसे. प.पू. गुरुदेवांनी ‘प्रारब्ध तीव्र आहे’, असे म्हटलेले वाक्य अधून-मधून आठवत असल्यामुळे मला अपघाताविषयी काही वाटत नसे आणि त्यामुळे मी सतत आनंदी असायचो. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला रुग्णालयातील रज-तमात्मक वातावरणाचा काहीही परिणाम जाणवत नव्हता. मी त्यांच्या कृपेमुळेच या अपघातातून वाचलो. घरी आल्यावरही मला ३ मास झोपूनच रहावे लागले.

‘माझ्याकडून काही सेवा होत नाही’, याचे मला पुष्कळ वाईट वाटत होते; पण अपघात झाल्याविषयी वाईट वाटत नव्हते.’

– श्री. श्रीकांत शांताराम देसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (५.६.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक