नागपूर येथे वीजचोरी उघडकीस आणणार्‍या महावितरण कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !

नागपूर – मीटरमधून अवैधरित्या वीज वापरणार्‍यांच्या विरोधात कारवाई करणारे  महावितरणचे कर्मचारी मुरलीधर निमजे यांना शेख अब्रार चिस्ती या धर्मांधाने मारहाण केली. शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी शेख अब्रार चिस्ती याच्या विरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. महावितरणच्या वतीने आरोपींच्या विरोधात वीजचोरी प्रकरणी नियमानुसार तक्रार प्रविष्ट करण्यात येणार आहे.

शहरातील गांधीबाग भागात वीजदेयक थकबाकी वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. भालदारपुरा येथील हकीमवाडा जवळच्या रुईकर रस्ता येथे वीजदेयक थकबाकी वसुली मोहीम राबवत असताना तंत्रज्ञ मुरलीधर निमजे यांना जैतुनासी शेख इनायत या ग्राहकाकडे असलेले वीजमीटर दुसर्‍याच्या नावाचे असून त्यावरून अवैधरित्या वीज वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी निमजे यांनी मीटर जप्त केले. तेव्हा आरोपी शेख अब्रार चिस्तीने मुरलीधर निमजे यांना धक्काबुक्की करत मारहाण करून शिवीगाळ केली.

संपादकीय भूमिका 

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !