विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा !

छत्रपती संभाजीराजे यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

विनायक मेटे, ज्योती मेटे आणि छत्रपती संभाजीराजे

बीड – ‘शिवसंग्राम संघटने’ला राजकीय ताकद देण्यासाठी विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा, अशी मागणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

२१ ऑगस्ट या दिवशी छत्रपती संभाजीराजे यांनी विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या वेळी संभाजीराजे कुटुंबियांशी चर्चा करतांना म्हणाले, ‘‘मी मेटे कुटुंबियांच्या समवेत असून विनायक मेटे यांचा अपूर्ण राहिलेला मराठा आरक्षणाचा लढा पुढे घेऊन जाणार आहे.’’