अलवर (राजस्थान) येथे धर्मांध मुसलमानांनी केली चिरंजीलालची  ‘समूह हत्या’ !

चिरंजीलाल

अलवर (राजस्थान) – येथे धर्मांध मुसलमानांकडून एका हिंदूची समूह हत्या (‘मॉब लिंचिंग’) झाल्याची घटना समोर आली आहे. १४ ऑगस्ट या दिवशी अलवर जिल्ह्यातील गोविंदगडच्या रामबास गावात चिरंजीलाल नावाच्या भाजी विक्रेत्यावर ट्रॅक्टर चोरी केल्याचा आरोप करत २०-२५ धर्मांध मुसलमानांनी त्याला अमानुष मारहाण केली. गंभीर घायाळ झालेल्या ४५ वर्षीय चिरंजीलाल यांना रुग्णालयात भरती केले असता उपचारांच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला.

१. या घटनेवरून आक्रोश करणार्‍या त्यांच्या कुटुंबियांनी ५० लाख रुपयांचे साहाय्य करण्याची, तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची आणि आरोपींना अटक करण्याची मागणीही केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ १६ ऑगस्टला गोविंदगड बाजार पूर्णपणे बंद होता.

२. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चिरंजीलाल यांचा मुलगा योगेश याचे म्हणणे आहे की, पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना सोडून दिले आहे. (हिंदूंना सापत्नपणाची वागणूक देणार्‍या काँग्रेसच्या राज्यात पोलिसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ? – संपादक) १६ ऑगस्ट या दिवशी चिरंजीलाल यांच्या कुटुंबियांनी त्यांचा अंत्यसंस्कार करण्याआधी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्ता रोको केला.

राजस्थान ‘पाकिस्तान’ बनत चालला आहे ! – भाजपचा आरोप

भाजपचे राजस्थानमधील नेते अभिषेक आचार्य कुलश्रेष्ठ यांनी या घटनेचा ट्वीट करून निषेध केला. ते म्हणाले की, राजस्थान पाकिस्तान बनत चालला आहे. जिथे काँग्रेसची सत्ता असते, तिथे हिंदूंची ‘सामूहिक हत्या’ केली जाते. पूर्ण राजस्थानमध्ये हिंदू असुरक्षित आहेत; परंतु मुख्यमंत्री अशोक गहलोत स्वत:ची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • काँग्रेसच्या राज्यात असुरक्षित होत चाललेले हिंदू !
  • नूह (हरियाणा) येथील ‘पहलू खान’ अथवा दादरी (उत्तरप्रदेश) येथील ‘अकलाख’ यांची हिंदूंनी कथित रूपाने हत्या केल्याचा आरोप करत आकाश-पाताळ एक करणारी धर्मनिरपेक्षतावाद्यांची टोळी आता गप्प का ? ‘चिरंजीलाल हिंदू असून हत्यारे हे धर्मांध मुसलमान आहेत’, म्हणजे ही हत्या योग्य आहे’, असे त्यांना म्हणायचे आहे का ?