संभाजीनगर येथे ‘ब्युटी पार्लर’ चालक महिलेची अपर्कीती केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा नोंद !

संभाजीनगर – वाळूज औद्योगिक परिसरात रहाणार्‍या आणि ‘ब्युटी पार्लर’ चालवणार्‍या एका महिलेचे इंस्टाग्रामवर खाते आहे. या महिलेच्या नावाने खोटे खाते काढत त्यावर अश्लील छायाचित्रे पोस्ट करून आणि महिलेचा भ्रमणभाष क्रमांक देऊन महिलेची अपर्कीती आणि विनयभंग केल्याप्रकरणी अनिता सावरे या महिलेवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अपर्कीती झालेल्या महिलेने सायबर पोलिसांकडे सावरे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.